शेतकरी उत्‍पादक कंपनी संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍यासाठी ऑनलाईन  प्रशिक्षण कार्यक्रम ( 27- 29 एप्रिल, 2021 )

Event Details

27 to 29 April 2021

10:30 am - 2:30 pm

Events

Pune- 411 004

ICM Pune

020-24269564

icmpune1947@gmail.com

-

शेतकरी उत्‍पादक कंपनी संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम ( 27- 29 एप्रिल, 2021 )

विषय : शेतकरी उत्‍पादक कंपनी संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍यासाठी ऑनलाईन 

                प्रशिक्षण कार्यक्रम ( 27- 29 एप्रिल, 2021 )

        

महोदय,

वरील विषयांस अनुसरुन आपल्‍याला कळविण्‍यात येते की कृषी मंत्रालय, भारत सरकार यांच्‍यामार्फत अनेक शेतीविषयक उपक्रम राबविण्‍याचे आदेश प्रत्‍येक प्रशिक्षण संस्‍थाना देण्‍यात आले आहेत व 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे धोरण सरकारी प्रशिक्षण संस्‍थाना पुढाकार घेउुन पूर्ण करायचे आहे.

या अनुशंगाने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्‍थान, पुणे  यांनी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन पध्‍दतीने शेतकरी उत्‍पादक कंपनी संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍यासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात समाविष्‍ट केलेले विषय खालीलप्रमाणे आहेत :

 

  • शेतकरी उत्‍पादक कंपनीची संकल्‍पना, गरज, महत्‍व व व्‍यवस्‍थापन
  • केंद्र व राज्‍य शासनाच्‍या शेतकरी उत्‍पादक कंपनीसाठी विविध योजना व आवश्‍यक कागदपत्राची पूर्तता
  • कंपनी कायद्याअंर्तगत तरतूद, नोंदणी व निर्मिती प्रक्रिया, कंपनीचे घटनापत्र व नियमावलीची तोंडओळख संचालक भूमिका, जबाबदा-या व हक्‍क
  • शेतकरी उत्‍पादक कंपनीच्‍या महत्‍वाच्‍या कायदेशीर तरतूदी
  • शेतकरी उत्‍पादक कंपानीचा व्‍यवसाय विकास आराखडा तयार करणे, कंपनीचा जमा खर्च लिहिणे, परिव्‍यय व मूल्‍य निर्धारण लेखा विषयक वित्‍तीय व्‍यवस्‍थापन व लेखा परीक्षण दोष दुरुस्‍ती अहवाल
  • शेतकरी उत्‍पादक कंपनीच्‍या माध्‍यमातून कृषी मालाचे विक्री व्‍यवस्‍थापन
  • शेतकरी उत्‍पादक कंपनी करीता शेतमालाच्‍या पर्यायी बाजारपेठेचे महत्‍व ऑनलाईन ट्रेडिंग (प्‍युचर /स्‍पॉट) गोदाम पावती योजना / collateral management
  • शेतकरी उत्‍पादक कंपनीसाठी नाबार्ड, SFAC, केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजना व धान्‍य तारण योजना

 

वर उल्लेख केल्या प्रमाणे, असे प्रशिक्षण शेतकरी उत्‍पादक कंपनीच्‍या प्रत्येक संचालक, मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि व्‍यवस्‍थापकाने घेणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा फायदा आपल्या संस्थेच्या प्रगती मध्ये निश्चित होईल. त्यामुळे जास्‍तीत जास्त शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांनी आपल्‍या प्रतिनिधींचे नामांकन ह्या कार्यक्रमामध्ये करावे. एका बॅच मध्ये साधारण 40 ते 45 प्रशिक्षणार्थी असतील.

प्रस्तुत प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतिने नियोजित असल्यामुळे अतिशय किफायती कार्यक्रम शुल्क रु. 1500/- + रु. 270/- (18% GST) = रु. 1770/- प्रति प्रशिक्षणार्थी आकारण्यात येईल. कार्यक्रम शुल्कात प्रशिक्षण साहित्याचा समावेश असेल. प्रशिक्षण साहित्य ई-मेल व्‍दारा पाठवण्यात येईल. प्रशिक्षणार्थीना ई-प्रमाण पत्र पाठवण्यात येईल. प्रशिक्षणार्थीकडे लॅपटॉप किंवा अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे.

 

कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कार्यक्रम शुल्क संस्थेकडे दि. 22-04-2021 पर्यंत जमा करुन प्रशिक्षणार्थींचे नाव व WhatsApp नंबरची यादी ई-मेल द्वारे icmpunetrg@gmail.com ह्या पत्यावर कळवावी जेणे करुन नामांकन अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी त्याना लिंक पाठविण्यात येईल. प्रशिक्षण शुल्‍क पाठविण्‍यासंबंधी संस्थेच्या बँक खात्‍याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

 

1 Name of the Account Holder Dr. Vitthalrao Vikhe Patil Institute of Cooperative Management, Pune
2 Bank Account Number 20084104446  Current Account
3 Name of the Bank Bank of Maharashtra,
4 Name of the Branch Karve Road, Pune
5 IFSC Code MAHB0000116
6 GST No. 27AAEAN3477B3ZM
7 PAN AAEAN3477B

 

अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या टेलीफोन क्रमांकावर किंवा कार्यक्रम सहाय्यक सौ. अर्चना स. वामन (9960849064) किंवा कार्यक्रम संयोजक श्री नवलकिशोर तिवारी (7350094733) यांच्याशी सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6.00 ह्या वेळेत संपर्क साधावा.

सहकार्याच्या अपेक्षेसह. कळावे,